हिंगणघाट: उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे शहरात २१ ऑगस्टला आगमन: बाजार समितीच्या नवीन इमारतीचे लोकार्पण व राका पक्ष मेळावा
हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नवीन प्रशासकीय इमारतीचा लोकार्पण सोहळा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व अर्थ नियोजन मंत्री ना. अजितदादा पवार यांच्या शुभहस्ते गुरुवारला दुपारी दिड वाजता होणार आहे.या कार्यक्रमाला आ. कुणावार, मा. राज्यमंत्री कांबळे, माजी केंद्रीय राज्यमंत्री मोहिते, विधान परिषद सदस्य संजय खोडके, मा. आ. राजू तिमांडे हें उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमात राष्ट्रीय कृषी विकास योजने अंतर्गत उभारण्यात आलेल्या गोदामचे लोकार्पण व विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.