जाफराबाद: शिवसेना खासदार संजय दिना पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करा पत्रकार बांधवांनी दिले टेंभुर्णी पोलीस ठाणे येथे निवेदन
आज दिनांक 27 जून 2026 वार शनिवार रोजी दुपारी 1 वाजेच्या सुमारास जाफराबाद ता.टेंभुर्णी येथे सकल पत्रकार बांधवांनी निवेदन देऊन मागणी केली आहे की दोन दिवसापूर्वी मुंबई येथे शिवसेना खासदार संजय दिना पाटील यांनी त्यांच्या निवासस्थानी बातमी कव्हर करण्यासाठी आलेल्या प्रसार माध्यमांच्या पत्रकारांना जीवे मारण्याची धमकी दिली, अपमानित केल,त्यामुळे त्यांनी लोकशाहीच्या चौथा स्तंभाचा अपमान केला,त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा असे मागण्याच निवेदन सहाय्यक पोलीस निरीक्षक राठोड यांना देण्यात आले.