हिंगणघाट: माजी आमदार तिमांडेसह शेकडो कार्यकर्त्यांचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश
हिंगणघाट विधानसभा मतदारसंघात शरद पवारांना आणखी एक मोठा धक्का बसला आहे. शरद पवार गटाच्या माजी आमदाराने पक्षाला रामराम ठोकला आहे. माजी आमदार राजू तिमांडे , निर्मेश कोठारी निखाडे सभागृहात आयोजित पक्षप्रवेश सोहळ्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत शेकडो कार्यकर्त्यांसह पक्ष प्रवेश केला.यावेळी संजय खोडके शरद सहारे जिल्हा अध्यक्ष सुबोध मोहीते माजी केन्दीय मंत्री ,सहकार नेते ॲड सुधिरबाबू कोठारी आदी उपस्थित होते.