हिंगणघाट: उपजिल्हा रुग्णालयाच्या वतीने संजय गांधी स्मृती विद्या मंदिरात जागतिक डास दिन साजरा:विद्यार्थ्यांना केले मार्गदर्शन
हिंगणघाट शहरातील उपजिल्हा रुग्णालयाच्या हत्तीरोग विभागाचे वतीने संजय गांधी स्मृती विद्या मंदिर येथे वैद्यकीय अधिक्षक डॉ. राहुल भोयर यांच्या मार्गदर्शनात जागतिक डास दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक उमेश मेश्राम प्रभारी आरोग्य सहायक यानी किटटज्यन आजार बाबत व डासाचे प्रकार बाबत माहीती दिली. डासांमुळे होणाऱ्या त्रासाबद्दल जागृत होऊ, डासांची पैदास होऊ नये यासाठी प्रयत्नशील राहू ''हे घोषवाक्य विद्यार्थाना सांगितले.