पेण: सुक्या मासळीसाठी खवय्यांची गर्दी
Pen, Raigad | May 18, 2026 पावसाळा काही दिवसांवर येऊन ठेपला असून एक जून पासून दोन महिने मासेमारी बंद असते. पावसाळ्यातील बेगमासाठी सुखी मासळी हक्काचा जिनस आहे. त्यामुळेच या दिवसांत सुखी मासळी खरेदी व साठवण करण्यासाठी अनेक जणांची लगबग सुरू आहे. त्यातच सध्या मासळीचे भाव स्थिर असून परिणामी खवय्ये सुखी मासळी खरेदीसाठी घाई करत आहेत. जिल्ह्यातील आठवडा बाजार व मासळी बाजारात सुखी मासळी खरेदीसाठी वेळ वेळ सुरू आहे. प्रतिकूल वातावरण व अवकाळी पावसामुळे मागील वर्षभरात कमी प्रमाणात मासळी सापडत आहे.