पेण: लालपरीचा प्रवास होणार महाग
Pen, Raigad | Apr 9, 2026 एसटी महामंडळाने 10 टक्के एसटी तिकिटात दरवाढ करण्याचा निर्णयघेतला आहे. 15 एप्रिल ते 15 जून 2026 या कालावधीत साधी, जलद आणि रात्रपाळीच्या सामान्य एसटी बसेस मध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दहा टक्के दरवाढ केली जाणार आहे. याचा मोठा फटका नियमित प्रवास करणाऱ्या प्रवाशांना बसणार आहे. सध्या एसटीमधून दररोज हजारो प्रवासी प्रवास करत असतात. ही दरवाढ हंगामी आहे.