वडिलांच्या मृत्यूनंतर अंत्यविधीआधी अंगठ्याचा ठसा घेतल्याचा आरोप! मालमत्तेच्या वादाचा VIDEO VIRAL
रहिमाबादमधील खरौहा गावात मालमत्तेच्या वादातून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ७६ वर्षीय छत्रपाल यांच्या मृत्यूनंतर, अंत्यविधीपूर्वी त्यांच्या एकुलत्या एक मुलाने कथितरित्या कोऱ्या कागदांवर मृत वडिलांच्या अंगठ्याचे ठसे घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे. 🚨
गावकऱ्यांनी या घटनेचे चित्रीकरण केल्याचा दावा असून, संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी प्रकरणाची दखल घेत तपास सुरू केला आहे.
कुटुंबीयांमध्ये मालमत्तेवरून दीर्घकाळापासून वाद सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. मृताच्या मुलीच्या आरोपानुसार, वडिलांच्या अंत्यविधीपूर्वी मुलाने आणि त्याच्या चुलत भावाने मिळून हा प्रकार केला.
📌 पोलिसांनी सांगितले की, व्हायरल व्हिडिओ आणि संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू असून, पुराव्यांच्या आधारे पुढील कायदेशीर कारवाई केली जा�
Pune City, Pune | Aug 14, 2026