विदर्भात ओबीसी राजकारण पुन्हा तापलं! 🔥
आगामी जातनिहाय जनगणनेत ओबीसींची स्वतंत्र नोंदणी व्हावी, या मागणीवरून विदर्भातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
दरम्यान, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कथित बदनामीप्रकरणी मनोज जरांगे पाटील आणि त्रिशूल पाटील यांच्यावर कारवाईची मागणी करत भाजपने नागपूर पोलिसांकडे निवेदन दिले आहे.
दुसरीकडे, राष्ट्रीय ओबीसी महासंघाने स्वतंत्र व प्रमाणित ओबीसी वर्गवारीची मागणी करत आंदोलनाचा इशारा दिला आहे. सकल ओबीसी महामोर्चाची मंडल यात्रा आणि काँग्रेसच्या ओबीसी विभागाची पदयात्रा यामुळे ओबीसी प्रश्न पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे.
📌 विदर्भातील ओबीसी राजकारणात पुढे काय घडणार?
अशाच महत्त्वाच्या महाराष्ट्रातील बातम्यांसाठी Times of Maharashtra फॉलो करा.
#OBC #OBCPolitics #OBCReservation #CasteCensus #Maharashtra #Vidarbha #Nagpur #MaharashtraPolitics #OBCMaharashtra #OBCCensus #ManojJarangePatil #ChandrashekharBawankule #NagpurNews #VidarbhaNews #MaharashtraNews #MarathiNews #MarathiNewsUpdate #PoliticalNews #MaharashtraPolitics #TimesOfMaharashtra