पालघर: शिवसेना शिंदे गट शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांची घेतली भेट; अवकाळी पावसाने नुकसानग्रस्त वर्गाला मदतीची केली मागणी
पालघर जिल्ह्यात मागील दोन दिवसात अवकाळी पावसामुळे शेतकरी बागायतदार मच्छिमार नागरिक यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यात संदर्भात शिवसेना शिंदे गटाच्या शिष्टमंडळाने पालघरच्या जिल्हाधिकारी डॉ.इंदुराणी जाखड यांची भेट घेतली. अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्यांना पंचनामे करून तात्काळ मदत करण्यात यावी अशी मागणी शिष्टमंडळाने यावेळी केली. याबाबतचे निवेदन देखील जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. शिवसेना शिंदे गटाचे पालघर जिल्हाप्रमुख व प्रमुख पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.