समुद्रपूर: मधमाशी संवर्धन अभियानाअंतर्गत शिवणफळ, जोगिंगगुफा येथे प्रशिक्षण व प्रात्यक्षिक कार्यक्रम पार पडला
मधमाशी संवर्धन अभियानाअंतर्गत शिवणफळ, जोगिंगगुफा येथे सोमवारी प्रशिक्षण व प्रात्यक्षिक कार्यक्रम पार पडला. शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सचिन खंडाते व उत्तम गव्हाणे यांनी उपस्थित शेतकऱ्यांना मधमाशी संवर्धनाची जनजागृती करीत यापासून होणारे फायदे व त्यापासून मिळणारे उत्पन्न यासंबंधी माहिती दिली.