समुद्रपूर: तालुक्यातील विविध ठिकाणी विश्वरत्न महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती मोठ्या उत्साहात साजरा
विश्वरतन महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त तालुक्यातील विविध गावात आज १४ एप्रिलला ११ वाजता डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी शाळा महाविद्यालये सरकार कार्यालयात ग्रामपंचायत कार्यालयात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे व प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली यावेळी अनेक गावांमध्ये मिरवणूक काढण्यात आली यावेळी यामध्ये मोठ्या संख्येने बौद्ध बांधव सहभागी झाले होते.