समुद्रपूर: भवानपुर येथे गावा शेजारी असलेल्या गोठ्यात शिरूर वाघाने पाडला वासराचा फडशा: गावकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण
गिरड सहवनश्रेतात येत असलेल्या भवनापुर गावातील शनिवारी रात्री १ वाजता सुमारास गावा शेजारी असलेल्या शेतकरी हरीभाऊ नेहारे यांच्या गोठ्यात शिरुन वाघाने गोठ्यात बांधून असलेल्या जनावरांपैकी १ गोऱ्याचा फडशा पाडल्याची घटना आज रविवारी सकाळी उघडकीस आली असुन या घटनेमुळे गावकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.घटनेची माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी निलेश गांवडे यांच्या मार्गदर्शनात गिरड येथिल श्रेत्रसायक नेव्हारे वनरक्षक सुशिल लांडगे , रंगनाथ कुंभारे,यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.