अमरावती: नवाथे गल्ली क्र.1 येथील घरफोडी प्रकरणी दोघांना जळगाव येथून अटक; 1.70 लाखांचा मुद्देमाल जप्त, राजापेठ पोलिसांची कारवाई
राजापेठ पोलिसांनी घरफोडी प्रकरणातील दोन आरोपींना अटक करत १.७० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई पोलीस आयुक्त अरविंद चावरीया यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. फिर्यादी विनायक पलनीसवामी हे अमरावतीतील नवाथे गल्ली क्रमांक १ येथे भाड्याने राहत होते. १५ मे रोजी ते मूळ गावी गेले असता, अज्ञात व्यक्तीने त्यांच्या घराचे कुलूप तोडून १.४४ लाख रुपये रोख व दोन लॅपटॉप (किंमत प्रत्येकी ३५ हजार रुपये) असा एकूण २.१४ लाख रुपयांचा ऐवज चोरीस नेला होता. यावरून राजापेठ पोलीस ठाण्यात भादंवि