अमरावती: जागातिक पर्यावरण दिनानिमित्त संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठात वृक्षारोपण,कुलगुरूंच्या हस्ते शुभारंभ
जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठात आज ५ जून गुरुवार रोजी दुपारी १२ वाजता वृक्षारोपण कार्यक्रम पार पडला. विद्यापीठाच्या परीक्षा विभागासमोर कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे, कुलसचिव डॉ. अविनाश असनारे, परीक्षा व मूल्यमापन मंडळ संचालक डॉ. नितीन कोळी, आजीवन अध्ययन व विस्तार विभाग संचालक डॉ. श्रीकांत पाटील, विद्यार्थी विकास संचालक डॉ. राजीव बोरकर, कार्यकारी अभियंता श्री. शशिकांत रोडे....