अमरावती: ग्रामीण रुग्णालयातील भोंगळ कारभाराविरोधात आठवले गटाकडून जिल्हा शल्यचिकित्सकांना निवेदन #Jansamasya
धामणगाव रेल्वे येथील ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय सेवा पूर्णतः ढासळलेल्या स्थितीत असून, रुग्णांच्या जीवाशी खेळ खेळला जात असल्याचा गंभीर आरोप रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) तर्फे करण्यात आला आहे. यासंदर्भात आज ५ जून गुरुवार रोजी दुपारी अडीच वाजता जिल्हा शल्यचिकित्सक, अमरावती यांना पक्षाच्या शिष्टमंडळाने निवेदन सादर केले.या निवेदनात म्हटले आहे की, ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक आणि इतर चार MBBS डॉक्टर असूनही ते आपले खासगी दवाखाने