अमरावती: पालकमंत्री यांच्या आव्हानाला जिल्हा प्रशासनाचा उस्फूर्त प्रतिसाद,एक पेड माँ के नाम उपक्रम अंतर्गत संपूर्ण जिल्ह्यात
राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या 300 व्या जयंतीनिमित्त जिल्ह्यातील प्रत्येकाने आपल्या घरासमोर आईच्या नावाने एक झाड लावण्याचे आवाहन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. या पार्श्वभूमीवर आज गुरुवारी दुपारी दीड वाजता जागतिक पर्यावरण दिनानिमित्त जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी 'एक पेड माँ के नाम' अंतर्गत त्यांच्या आईच्या नावे पिंपळाचे रोप लावून वृक्षारोपण केले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण केले.