21 फेब्रुवारीला रात्री 7 वाजताच्या सुमारास मिळालेल्या माहितीनुसार गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे दुचाकी चोरी करणाऱ्या आरोपींना अटक केली आहे. अटकेतील आरोपीचे नाव शांतनु सोमकुवर असे सांगण्यात आले असून त्याने त्याचा साथीदार सुरज धुर्वे सोबत मिळून चोरी केल्याचे कबूल केले. आरोपीकडून दोन दुचाकी किंमत एक लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपी विरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहे.