चारित्र्याच्या संशयातून पतीचे क्रूर कृत्य; पत्नीला खुर्चीला बांधून पेटवले, उपचारांपूर्वीच मृत्यू
उत्तर प्रदेशातील कन्नौज जिल्ह्यातील छिबरामऊ परिसरातील जगतपूर गावात एक धक्कादायक घटना घडली आहे. पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत पतीने सोनम हिला खुर्चीला बांधून तिच्यावर पेट्रोल ओतून आग लावल्याचा आरोप आहे. या घटनेत गंभीर भाजल्याने सोनमचा मृत्यू झाला.
पोलिसांच्या माहितीनुसार, पत्नीच्या चारित्र्यावरून पती-पत्नीमध्ये काही काळापासून वाद सुरू होता. याच वादातून पतीने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे प्राथमिक माहितीतून समोर आले आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
#UttarPradesh #KannaujCrime #DomesticViolence #CrimeNews #WomenSafety