समुद्रपूर: वाकसुर घाटावर महसूलच्या पथकाला धमकी देऊन अवैध वाळू वाहतूक करणारा चालक ट्रॅक्टर घेऊन पसार, समुद्रपुर पोलिसांत गुन्हा दाखल
महसूल विभागाच्या पथकाने तहसिलदार कपिल हाटकर यांच्या मार्गदर्शनात वणा नदीच्या वाकसुर वाळू घाटावर अवैध वाळू वाहतक करणारा ट्रॅक्टर चालक सोमवारी रात्री १२.३० वाजता महसूल विभागाच्या पथकाला थमकी देऊन अंधाराचा फायदा घेऊन ट्रॅक्टर घेऊन पसार झाल्याची तक्रार समुद्रपुर पोलिस ठाण्यात करण्यात आल्याची माहिती मंगळवारी तहसिलदार कपिल हाटकर यांनी दिली असून पोलिसांनी यासंबंधी गुन्हा नोंद केला आहे.