समुद्रपूर: कांढळी केंद्रातील ४ जिल्हा परिषद शाळेतील १८ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षेत सुयश: गटशिक्षणाधिकारी अशोक गिदेवार
शासकीय परीक्षा मंडळा पुणे तर्फे घेण्यात आलेल्या वर्ग पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे .शिष्यवृत्ती पात्र होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तीन वर्षाकरिता प्रत्येकी पाच पाच हजार रुपये अशी शिष्यवृत्ती शासनातर्फे दिली या शिष्यवृत्ती करिता इयत्ता पाचवीसाठी कांढळी केंद्रांतर्गत येणाऱ्या चार उच्च प्राथमिक शाळेच्या १८ विद्यार्थ्यांनी घवघवीत यश प्राप्त केल्याची माहिती आज सोमवारी ४ वाजता गटशिक्षणाधिकारी अशोक गिदेवार यांनी दिली आहे.हा निकाल तालुक्यात सर्वाधिक आहे.