समुद्रपूर: खेक येथे पुतण्याला काका व त्यांच्या मुलाने जागेच्या कारणावरून बांबूच्या काठीने व लाथाबुक्क्यांनी मारहाण करून केले जखमी
खेक येथे ३ मेला ४ वाजता दिनेश शंकर कन्नाचे वय ३० वर्ष राहणार खेक यांच्याशी त्याचा सख्खा काका धोंडबाजी कन्नाके व त्यांच्या मुलगा सुरेश धोंडबा कन्नाके या दोघांनी घराच्या जागेच्या कारणावरून दिनेश यांच्याशी वाद करून त्याला पायावर हातावर व डोक्यावर बांबूच्या काठीने व लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जखमी केले असून यासंबंधी ४ मेला १२ वाजता गिरड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्याची माहिती आज ५ मेला पोलिसांकडून प्राप्त झाली असून यासंबंधी तपास ठाणेदार संदिप गाडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस करीत आहे.