समुद्रपूर: दुचाकीवरून पडून महिलेचा जागीच मृत्यू:आर्वी मोहगांव रस्त्यावरील घटना
आर्वी मोहगांव रस्त्यावरील मुलांसोबत गिरडला बॅकेत दुचाकीने येत असलेली महिलेला अचानक चक्कर येऊन खाली पडून तिचा जागीच मृत्यू झाला.प्राप्त माहितीनुसार सोमवारी ६ मेला १ वाजताच्या सुमारास तावी येथील शेशिकला नामदेव बावणे वय ४५ वर्ष हि तिचा मुलगा केतन नामदेव बावणे यांच्या सोबत तावीवरुन दुचाकी क्रमांक एम एच ३४ झेड ४५३५ ने गिरड येथे बॅकेच्या कामानिमित्ताने येत असतांनाच शेशिकला यांना मोहगांव आर्वी रस्त्यावर अचानक चक्कर येऊन त्या चालत्या दुचाकीवरून खाली रस्त्यावर पडून मृत्यू झाला.