समुद्रपूर: ट्रकने जुपिटरला २० फुट नेले घिसाटत : दुचाकी चालक गंभीर जखमी:शेडगाव चौरस्त्यावरील घटना
शेडगाव चौरस्तावर नियमित अपघाताचे सत्र सुरु आहे.मंगळवारी सकाळी ७.३० वाजताच्या सुमारात एका ट्रॅकने दुचाकीला २० फूट घिसकाटत नेलेयात जुपिटर चालक प्रविण डुकरे राहणार शेडगाव गंभीर जखमी झाला.दरम्यान अर्धा तास रस्त्यावर वाहनाच्या रांगा लागल्या होत्या.कासवगतीने सुरु असलेल्या पुलाच्या कामामुळे रस्त्याच्या कडेच्या दोन्ही बाजू अरुंद आहे. त्यामुळे रस्त्याने वाहने नेतांना नियमित अपघात घडत आहेत.