पेण: शहापाडा धरणातील गाळ काढण्यास २२ वर्षानंतर मुहूर्त
Pen, Raigad | Apr 15, 2026 पेण तालुक्यातील वाशी-शिर्की खारेपाट परिसरासाठी जीवनदायी ठरलेल्या शहापाडा धरणातील गाळ काढण्याच्या कामाला तब्बल 22 वर्षानंतर मुहुर्त सापडला असून, प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली आहे. गाळ काढण्याचे काम पूर्ण झाल्यावर यंदाच्या पावसाळ्यात गाळ पूर्णपणे धरणाबाहेर जावून धरणातील जलसंकलनात वाढ होणार असून, खारेपाटातील गावांना पाणी पुरवठा करण्याचा मार्ग सुकर होणार आहे.