जागतिक व्याघ्र दिन गिरड जंगल सफारी प्रकल्प विविध कार्यक्रमांचे आयोजन
Seloo, Wardha | Jul 30, 2026 समुद्रपुर:तालुक्यातील गिरड वनपरिक्षेत्रातीच्या वतीने गिरड येथे नव्याने उभारण्यात आलेल्या जंगल सफारी प्रकल्पात उपवनसंरक्षक हरविर सिंग सहाय्यक वनरक्षक हरीष सरोदे यांच्या मार्गदर्शनात वनपरिक्षेत्र अधिकारी स्वप्ननिल ढोणे यांच्या नेतृत्वात जागतिक व्याघ्र दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी याठिकाणी वृक्षलागवड सह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी वनपरिक्षेत्र अधिकारी स्वप्ननिल ढोणे तर प्रमुख पाहुणे म्हणून मोहगांव ग्रामपंचायतीचे प्रशासक विलास नवघरे, राकेश बोबडे प्रामुख्याने उपस्थित होते.यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते जंगल सफारी प्रकल्पात वृक्षारोपण करण्यात आले.