समुद्रपूर: मंगरूळ येथे मच्छिंद्रनाथ महोत्सव व मेळावा मोठ्या उत्साहात साजरा: विविध कार्यक्रमाचे आयोजन
समुद्रपूर तालुक्यातील मंगरूळ येथे महर्षी वाल्मिकी व मच्छिंद्रनाथ महोत्सव यानिमित्त समाज प्रबोधन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाचे अध्यक्षांनी प्रशांत कोल्हे सेलू तालुका अध्यक्ष भोई समाज क्रांती दल महाराष्ट्र प्रदेश,प्रमुख पाहुणे म्हणून नागपूर विभागीय अध्यक्ष पंकज बावणे यांच्या प्रमुख उपस्थितीत होते यावेळी उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते प्रतिमा पुजन व दिप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.विभागीय अध्यक्ष पंकज बावणे यांनी आपल्या समाज बांधवांना संबोधत केले.