समुद्रपूर: गिरड येथे महाअन्नपूर्णा खत निर्मिती प्रशिक्षण; मगन संग्रहालयाचे 'घर में बनाओ खाद, डीएपी का बाप' अभियान
गिरड : शेतीचा उत्पादन खर्च वाढीस लागला आहे. खताच्या किंमती गगणाला भिडल्या तर खताच्या मात्रा वाढवून देखील उत्पादन क्षमता वाढण्या ऐवजी घटत चालल्याने आता शेतकऱ्यांनी घरच्या घरी खत निर्मिती करून पैश्याची बचत करावी आणि जमिनीची सुपीकता वाढवून उत्पादनात वाढ़ करावी यासाठी गिरड येथील मगन संग्रहालय वतीने महा अन्नपूर्णा खत निर्मिती प्रशिक्षण घेण्यात आले.या प्रशिक्षणात नैसर्गिक शेती विकास केंद्राचे प्रमुख गजानन गारघाटे यांनी जिवाणू खताचे महत्व,सागितले.