समुद्रपूर: गणेपूर पारधी बेड्यावर समुद्रपुर पोलिसांची गावठी मोहा दारू भट्टीवर धाड, ४ लाख ६४ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जागीच नष्ट
समुद्रपुर पोलिसांनी गणेपूर पारधी बेड्यावर गावठी मोहा दारू भट्टीवर धाड टाकून याठिकाणी असलेले मोही दारू व मोहा जमिनीत गाडून असलेला आणि साहीत्य अशा एकूण ४ लाख ६४ हजार ७०० रुपये किंमतीचा मुद्देमाल नष्ट केला.हि कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक नुरुल हसन,अप्पर पोलीस अधीक्षक डॉ सागर कवडे, उपविभागीय पोलिस अधिकारी रोशन पंडित, ठाणेदार संतोष शेगावकर यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक अनिल देरकर, पोलिस कर्मचारी प्रमोद थुल,राजेश शेंडे, सचिन भारशंकर,प्रमोद जाधव, अशिष कांबळे यांनी केली.