समुद्रपूर: उमरा आणि पारडी घाटावरील रेती तस्करी प्रकरणातील १२ आरोपींना दिवाणी न्यायालयाने सुनावली १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
समुद्रपुर:तालुक्यातील उमरा आणि पारडी शिवाराती वणा नदीच्या रेती घाटावर पोलिसांनी शासनाने प्रधिकृत केलेल्या नियम व अटीचे शर्तीचे उल्लघन करुन अवैध रेती तस्करी करणाऱ्या विरोधात २२ मेला पहाटे ४ वाजता जिल्हा पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांच्या प्रत्येक्ष मार्गदर्शनात कारवाई करीत १ करोड ५७ लाख २० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला होता.या प्रकरणी १२ आरोपी विरोधात गुन्हा दाखल करून सर्वांना अटक करून गुरुवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने सर्व आरोपींना १४ दिवसाची न्यायलीय कोठडी सुनावली.