कोरेगाव येथील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र (ट्रस्ट) तर्फे आयोजित श्री दत्त जयंती उत्सवास बुधवारी भक्तिमय सुरुवात झाली आहे. सात दिवसांच्या गुरुचरित्र पारायण सप्ताहाचा समारोप होताच मंदिर परिसर भक्तिरसाने ओतप्रोत भरून गेला. ट्रस्टचे अध्यक्ष विश्वास कुंभार व उपाध्यक्ष कृष्णराव साळुंखे यांनी दिलेल्या माहितीनुसार, २८ नोव्हेंबर ते ४ डिसेंबर २०२५ दरम्यान दररोज सकाळी ८ ते ११ या वेळेत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.