अमरावती: महाविकास आघाडीला 'ईव्हीएम'वर शंका असेल तर, अमरावतीच्या खासदारांनी राजीनामा द्यावा: माजी खासदार नवनीत राणा
महाविकास आघाडीला ईव्हीएम वर जर ऑब्जेक्शन असेल तर अमरावतीच्या काँग्रेस खासदारांनी राजीनामा द्यावा,बडनेरा मतदारसंघाचे आमदार रवी राणा देखील राजीनामा देतील. दोन्ही ठिकाणी बॅलेट वर मतदान घेण्यात यावे, असे आव्हान माजी खासदार तथा भाजप नेत्या नवनीत राणा यांनी रविवारी(दि.८) दिलं आहे. लोकसभेत महाविकास आघाडीच्या चांगल्या सीट्स निवडून आल्या त्यावेळेस ईव्हीएम बरोबर होते. तेव्हा लोकशाही जिवंत होती, असेही त्या पुढे बोलताना म्हणाल्या.