नागपूर शहरात आज युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारविरोधात तीव्र निदर्शने केली. 'एपस्टाईन फाईल्स' मध्ये करण्यात आलेल्या दाव्यांचा संदर्भ देत, "पंतप्रधान मोदी तडजोड केलेले नेते आहेत"असा खळबळजनक आरोप कार्यकर्त्यांनी यावेळी केला.हे आंदोलन अत्यंत आक्रमक पद्धतीने करण्यात आले. यावेळी काही कार्यकर्त्यांनी आपले शर्ट काढून 'शर्टलेस' होत सरकारचा निषेध नोंदवला. त्यांच्या हातात मोठे फलक आणि बॅनर होते.