नरखेड: नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकडे राज्य शासनाचे दुर्लक्ष : माजी गृहमंत्री अनिल देशमुख
राज्यात तीन-चार महिन्यांपूर्वी मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली. संपूर्ण महाराष्ट्रात शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं होतं. तेव्हा मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं की आम्ही केंद्र सरकारकडून मोठी मदत शेतकऱ्यांना मिळवून देऊ पण आज केंद्रीय कृषिमंत्र्यांनी संसदेत राज्य शासनाकडून कोणताही प्रस्ताव आला नसल्याच स्पष्ट केलं. यावर बोलताना मुख्यमंत्री आता उडवाउडवीची उत्तर देत आहेत. यावर माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी प्रतिक्रिया यांनी प्रतिक्रिया दिली आहे.