मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी नागपूर येथील एका विधवा महिलेवर झालेल्या अन्यायावरून राज्य सरकार आणि विशेषतः गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली आहे. धनंजय मुंडे यांच्या कार्यकर्त्यांनी छळ केल्याचा आरोप करणाऱ्या त्या महिलेला न्याय मिळवून देणे ही फडणवीसांची जबाबदारी असल्याचे त्यांनी म्हटले आहे.या प्रकरणावर आता राज्य सरकार आणि पोलीस प्रशासन काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.