पोलादपूर: मातीचा ओसरा सह झाड पडल्याने मंगळवारी वाहतूक ठप्प
पोलादपूर वाई महाबळेश्वर सुरुर राज्य मार्गावरील पावसाळी हंगामातील दरड सह मातीचा ओसरा झाड पडण्याचे सातत्य कायम राहिले आहे. या मार्गावर मंगळवारी सायंकाळी 6 च्या सुमारास पोलादपूर हद्दीतील कुंभलवणे फाटा येथे मातीचा ओसरा तर कापडे ते पायटा या दरम्यान झाड पडल्याने काही तासाकरता रस्ता दोन्ही बाजूने ठप्प झाला होता. यामुळे आंबेनळी घाटात दरडीची भीती वाहनधारकांच्या मनात कायम आहे. या घटनेची माहिती मिळतात पोलादपूर आपत्ती निवारण लक्ष सह पोलादपूर पोलीस यांनी घटनास्थळी धाव घेत जेसीबीच्या साह्याने दगडमाती तात्काळ हटवण्याचे काम सुरू केले.