Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
India
Coronavirus
कांग्रेस
मौत
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
मध्यप्रदेश
Bollywood
Breakingnews
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
Uttarpradesh
Haryana
Uttarakhand
Crimenews
Karnataka
Education
Rss
Firozabad

अलिबाग: आंबेपूर मतदार संघात शिवसेनेची रॅली मोटार सायकल रॅलीला अभूतपूर्व प्रतिसाद शेकडो शिवसैनिक रॅलीत सहभागी

Alibag, Raigad | Feb 5, 2026
जिल्‍हा परीषद निवडणूक प्रचाराच्‍या शेवटच्‍या दिवशी अलिबागच्‍या आंबेपूर मतदार संघातील शिवसेनेच्‍या उमेदवार रसिका केणी यांच्‍या प्रचारासाठी संपूर्ण मतदार संघात मोटार सायकल रॅली काढण्‍यात आली. शिवसेना रायगड जिल्‍हा प्रमुख राजा केणी यांच्‍या नेतृत्‍वाखाली सांबरी इथं रॅलीला प्रारंभ झाला. संपूर्ण मतदार संघात फिरून दुपारी रॅलीची सांगता झाली. या रॅलीत शेकडो शिवसैनिक सहभागी झाले होते. मोटार सायकलला लावलेल्‍या भगव्‍या झेंडयांमुळे वातावरण भारावून गेले होते. सहभागी शिवसैनिक जोरदार घोषणा देत होते. शिवसेना झिंदाबाद, आमदार महेंद्र दळवी आगे बढो, राजा केणी आगे बढो, हम तुम्‍हारे साथ है अशा घोषणांनी परीसर दुमदुमुन गेला होता. रॅलीच्‍या मार्गावर फटाक्‍यांच्‍या आतषबाजीत जोरदार स्‍वागत केले.
अलिबाग: आंबेपूर मतदार संघात शिवसेनेची रॅली मोटार सायकल रॅलीला अभूतपूर्व प्रतिसाद शेकडो शिवसैनिक रॅलीत सहभागी - Alibag News