पोलादपूर: सावित्री नदी प्रदूषणाविरोधात 'आपली माती आपली माणसं'चे आंदोलन
पोलादपूर शहरातील घनकचऱ्याच्या गंभीर प्रश्नावर अखेर 'आपली माती आपली माणसं' संघटनेने आंदोलनाचा मार्ग अवलंबत सावित्री नदी बचावासाठी जोरदार आंदोलन छेडले. संस्थापक राज पार्टे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात प्रशासनाला थेट कचरा टाकण्याच्या ठिकाणी नेऊन वास्तव परिस्थिती दाखवण्यात आली. शहरातील घनकचरा सावित्री नदी पात्रात टाकला जात असल्याने नदीचे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे.