हवेली: लोणी कंद येथे टेम्पोच्या धडकेत दुचाकीवरील अज्ञाताच्या मृत्यू प्रकरणात दुचाकीचा नंबर चुकीचा
Haveli, Pune | Oct 4, 2025 लोणीकंद येथील म्हसोबा मंदिरासमोर टेम्पोची दुचाकीला धडक बसून अपघातात मृत झालेल्या दुचाकी चालकाची ओळख पटलेली नसताना, सीडी १०० एस एस या अपघातातील दुचाकी असलेल्या नंबर वरून केसनंद मधील रेवणनाथ लहाने नामक व्यक्तीची असल्याचे पोलिस तपासात पुढे आले आहे. अपघातग्रस्त दुचाकीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर लहाने कुटुंबियांनी अपघातग्रस्त दुचाकीवर नंबर चुकीचा वापरला असल्याचे सांगितले तसेच त्यांची दुचाकी, कागदपत्रे घरीच असल्याचे सांगितले.