"पिंपळे गुरव सुदर्शन चौक भीषण अपघात"
पिंपळे गुरव येथील सुदर्शन चौक ग्रेड सेपरेटरमध्ये भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. या अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
अपघातामुळे ग्रेड सेपरेटरमधील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस तसेच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले.
सुदर्शन चौक ग्रेड सेपरेटरमध्ये वारंवार अपघाताच्या घटना घडत असल्याने वाहनधारकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. अपघातप्रवण ठिकाणी आवश्यक त्या सुरक्षात्मक उपाययोजना तातडीने करण्यात याव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
#pimplesaudagar #pimprichinchwad #accident #traffic #punenews
Pune City, Pune | Aug 24, 2026