जाफराबाद: पंचायत समिती परिसरामध्ये आ.संतोष पाटील दानवे यांच्या उपस्थितीत पार पडले छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर
आज दि.15 मे 2026 वार शुक्रवार रोजी दुपारी 1 वाजेच्या सुमारास जाफराबाद शहरातील पंचायत समिती परिसरामध्ये भोकरदन जाफराबाद विधानसभा मतदारसंघाचे भा. ज. पा. महायुतीचे आ.संतोष पाटील दानवे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये महाराष्ट्र शासनाच्या वतीने आयोजित छ. शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर संपन्न झाल आहे या शिबिरामध्ये शेतकऱ्यांच्या, लाडक्या बहिणींच्या अडीअडचणी व इतर अडीअडचणी संदर्भात महसूल अधिकाऱ्यांकडून माहिती घेत सोडवण्याच्या सूचना देण्यात आले आहे.