जागतिक पर्यावरण दिनानिमित्त भाजपकडून डोंबिवली जुने आयरे रोड परिसरात वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात
वृक्षारोपण करून पर्यावरण संरक्षणाची सामूहिक जबाबदारी जपण्याचा संकल्प
डोंबिवली : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त शुक्रवारी जुना आयरे रोड, डोंबिवली पूर्वेत भारतीय जनता पार्टी जनसंपर्क कार्यालयाजवळ वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी आयोजित या उपक्रमात पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच स्थानिक नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.या प्रसंगी माजी नगरसेवक संतोष केणे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रणव केणे, राहुल केणे, श्रावण पाटील, अनंत भोईर, राकेश पाटील, शंकर म्हात्रे, संतोष विचारे, धर्मेश ठाकरे, शिवाजी कांबळे, गीता कुमठाकर आदी मान्यवर उपस्थित होते.तसेच केडीएमसीचे स्वच्छता निरीक्षक जयंत गाडे, सुमित एल्कोचे पदाधिकारी, सुपरवायझर कारण कालन, हृषीकेश गोरपेकर, युनिट ऑफिसर किरण पवा�
Kalyan, Thane | Jun 5, 2026