अमरावती: साक्षी अपार्टमेंट न्यू कॉलनी मंगलधाम येथून ८५ हजारांच्या दुचाकीची चोरी, फ्रेजरपूरा पोलिसांत गुन्हा दाखल
फ्रेजरपुरा पोलीस स्टेशन हद्दीत साक्षी अपार्टमेंट न्यू कॉलनी मंगलधाम येथून नवीनच घेतलेली 85 हजारांची निळ्या रंगाची जुपिटर दुचाकी क्रमांक एम एच 27 डीव्ही 6429 लंपास करण्यात आली. ही घटना 8 डिसेंबर रोजी दुपारी साडेबारा वाजता उघडकीस आली.त्यामुळे या प्रकरणी फिर्यादी संजय दत्तात्रेय रेवसेकर वय 55 राहणार साक्षी अपार्टमेंट यांनी फ्रेजरपुरा पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली.या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे,अशी माहिती 9 डिसेंबर रोजी दुपारी साडेचार वाजता प्राप्त झाली.