हिंगणघाट: नवीन समाज भवन श वाचनालय हे केवळ एक वास्तू नसून, समाजातील सर्व घटकांना एकत्र आणणारे केंद्र: आमदार कुणावार
हिंगणघाट येथील जेतवन बुद्ध विहारात ५० लक्ष रुपये किंमतीच्या समाज भवन व वाचनालयाचे लोकार्पण आमदार कुणावार यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडले. विविध सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक उपक्रमांसाठी हे नवे केंद्र आता शहरातील नागरिकांसाठी खुले झाले आहे.नवीन बांधलेले समाज भवन आणि वाचनालय हे केवळ एक वास्तू प्रकल्प नसून, समाजातील सर्व घटकांना एकत्र आणणारे, बौद्ध तत्त्वज्ञानाचे प्रचारक आणि शिक्षण-विकासाचा महत्त्वाचा केंद्रबिंदू ठरणार आहे. असे मत आमदार कुणावार यांनी व्यक्त केले