हिंगणघाट: शहरातील आठवडी बाजार व सरकार दवाखाना चौकात पोलिसांची अवैध व्हिडिओ गेम पार्लरवर मोठी कारवाई:लाखो रुपयांचे साहित्य जप्त
हिंगणघाट शहरातील शहरातील आठवडी बाजार व सरकारी दवाखाना चौकात पोलिसांनी अवैध व्हिडिओ गेम पार्लरवर मोठी कारवाई करीत लाखो रुपयांचे साहित्य जप्त केली. प्राप्त माहितीनुसार पोलिसांना शहरातील आठवडी बाजार व सरकारी दवाखाना चौकात या दोन ठिकाणी अवैध व्हिडिओ गेम पार्लर सुरू असल्याची माहिती मिळताच दोन वेगवेगळ्या डिबी पथकाने दोन्ही ठिकाणी धाड टाकून पाहणी केली असता याठिकाणी अवैध अवैध व्हिडिओ गेम पार्लर सुरू असलेल्याचे निदर्शनास आले यावेळी पोलिसांनी दोन्ही ठिकाणी कारवाई केली आहे.