18 फेब्रुवारीला रात्री 9 वाजताच्या सुमारास मिळालेल्या माहितीनुसार पोलीस ठाणे नंदनवन हद्दीतील शांतिनाथ अपार्टमेंट येथे राहणारे गणेश पारधी व त्यांची पत्नी नंदा पारधी यांनी लाकडी कपाटात सोन्याचे दागिने आयफोन व घड्याळ ठेवले होते. दरम्यान नंदा यांनी दागिने पाहिजे असता अज्ञात आरोपीने तब्बल चार लाख दहा हजार 980 रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला होता. याप्रकरणी नंदनवन पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस करीत आहे.