हिंगणघाट: आमदार कुणावार यांच्या हस्ते पार पडले शहरवासीयांच्या आस्थेच्या सार्वजनिक अन्नपूर्णा माता मंदिराचे भूमिपूजन
हिंगणघाट शहरातील सार्वजनिक अन्नपूर्णा माता मंदिराच्या भव्य भूमिपूजन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या पावन कार्याची सुरुवात आमदार समिरभाऊ कूणावार यांच्या उपस्थितीत विधिवत पूजा करून करण्यात आली. अन्नपूर्णा माता मंदिर हे शहरातील सर्वसामान्य नागरिकांसाठी एक श्रद्धास्थान आणि सामाजिक एकतेचे प्रतीक ठरणार आहे. मंदिराच्या कुदळ मारून जिर्णोद्धार कामालाही विधिवत शुभारंभ करण्यात आला. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते मंदिराच्या वास्तुची पहिली घाव टाकून नव्या अध्यायाची सुरु करण्यात आली.