टेमणी (गोंदिया): ग्रामीण भागातील आरोग्य सुदृढ करण्याच्या उद्देशाने, स्व. शोभादेवी विद्यालय व मयूर विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय, टेमणी येथे 'अरुणोदय' अभियानांतर्गत सिकलसेल ॲनिमिया जनजागृती मोहिमेचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाद्वारे विद्यार्थी आणि ग्रामस्थांना सिकलसेल आजाराची लक्षणे, प्रतिबंध आणि उपचारांबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.