दिल्लीमध्ये ४ वर्षांचा चिमुकला गटारात पडला! NDRF, अग्निशमन दलासह अनेक पथकांकडून युद्धपातळीवर शोधमोहीम
दिल्लीच्या नांगली विहारमधील दास गार्डन कॉलनीजवळ एक हृदयद्रावक घटना घडली आहे. अवघ्या चार वर्षांचा चिमुकला गटारात पडल्याने परिसरात चिंता व्यक्त केली जात आहे.
मुलाचा शोध घेण्यासाठी मोठी बचाव मोहीम सुरू असून NDRF, दिल्ली अग्निशमन दल, पोलीस, DDMA आणि BSFची पथके शोधकार्यात सहभागी झाली आहेत. मात्र, अद्याप मुलाचा शोध लागलेला नाही. बचाव पथकांकडून शोधमोहीम सुरू आहे.
#Delhi #NangliVihar #RescueOperation #NDRF #DelhiFireService BreakingNews ChildRescue दिल्ली बचावमोहीम NDRF
Pune City, Pune | Nov 11, 2026