जाफराबाद: होळकर नगर येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर नियोजन बैठक संपन्न
आज दिनांक 28 मे 2026 वार गुरुवार रोजी दुपारी 2 वाजेच्या सुमारास जाफराबाद शहरातील होळकर नगर येथे सकल धनगर समाज बांधवांची बैठक संपन्न झाली आहे या बैठकीचे कारण म्हणजे 31 मे 2026 रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची 301 वी जयंती आहे,त्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन जाफराबाद शहरात करण्यात आली आहे, या कार्यक्रमाचा लाभ सर्व जाफराबाद वासियांनी व तालुक्यातील नागरिकांनी घ्यावा यासाठी व जयंती नियोजनासाठी ही बैठक आज समाज बांधवांनी घेतली आहे.