मौदा: अवैधरित्या रेती वाहतूक करणारा टिप्पर पावडदौना शिवारात मौदा पोलीसांनी पकडला
Mauda, Nagpur | Apr 18, 2026 पोलीस स्टेशन मौदा अंतर्गत येत असलेल्या पावडदौना शिवारात गुप्त माहितीच्या आधारे मौदा पोलिसांच्या पथकाने अवैधरित्या रेती वाहतूक करणारा टिप्पर पकडल्याची घटना घडली. त्यावरून रेती व टिप्पर जप्त करण्यात आला असून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.